एक पाऊल पुढे : दुर्गम गावांमधील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जागरूकता

गावाला विकसित समाजात रूपांतरित करण्यात सामाजिक जाणीव महत्त्वाची भूमिका बजावते. खेड्यातील विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, कारण ते त्यांच्या समाजाचे भविष्य आहेत. चिल्लर पार्टी व समाजभान समूहाच्या वतीने कोल्हापुरातील दुर्गम खेड्यांतील विद्यार्थ्यांना कसे सक्षम केले जात आहे. सामाजिक जागरूकता कार्यक्रम आणि दुर्गम खेड्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी एकत्रितपणे काम करणारी टीम याबद्दलचा ब्लॉग.


शुक्रवार दिनांक 21/ 4/ 2023 रोजी आमच्या सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला . मा. विश्वास सुतार साहेब यांच्या प्रेरणेतून पुष्पगुच्छ ला फाटा देऊन आम्ही मान्यवरांचे स्वागत पुस्तक देऊन केले व आपण सर्वांनी वह्यांच्या रूपाने सदिच्छा दिल्यात खरं तर आपल्या सहकार्यानेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. 

विद्यार्थी शाहू स्मारक या ठिकाणी जमले

आज चिल्लर पार्टी व समाजभान समूहाच्या वतीने  वि.म.कोनोली, केंद्र शाळा वळवन,वि.म.बनाचीवाडी, वि.म.हसणे ,वि.म.धनगरवाडा, वि.म.मांडरेवाडी ,वि.म.दाजीपूर, वि.म.हसणे तांबे वाडी  अशा वाडी वस्तीवरील दुर्गम शाळा मधून जेथे एस.टी ही जाऊ शकत नाही अशा शाळांचे 300  विद्यार्थी शाहू स्मारक या ठिकाणी जमले होते हे विद्यार्थी असे होते की ज्यांनी कोल्हापूर पाहिलेलं नाही. अशा विद्यार्थ्यांना मा .विश्वास सुतार साहेब यांच्या उपस्थितीत 400  वह्यांचे वितरण प्रतिनिधी स्वरूपात केले. 402 वह्या जमल्या होत्या दोन वह्या मी आपल्या सर्वांची प्रेमाची आठवण म्हणून माझ्या लायब्ररीत ठेवल्या आहेत. आज समाज भान ठेवून समाजकार्य केल्याचा मनस्वी आनंद होत आहे खरंतर हे कार्य आपलंच आहे. आम्ही फक्त मधला दुवा आहोत. दुपारच्या जेवणाच्या वेळी विद्यार्थ्यांची गरज ओळखून प्रतिनिधी वह्या वितरित करणार आल्या.

चित्रपटगृहात चित्रपट पाहताना विद्यार्थी

विशेषत: खेड्यातील समाजाने, सामुदायिक सेवेत गुंतून, जागृती कार्यक्रम आयोजित करून, मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून, शिक्षणाचा प्रसार करून आणि पर्यावरणपूरक सवयींना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव वाढवण्यास मदत केली पाहिजे. अशा उपक्रमांमुळे वैयक्तिक वाढीसाठी संधी निर्माण होतात, चारित्र्य निर्माण करण्यात मदत होते आणि सामाजिक जबाबदारी वाढते.